‘हम बने तुम बने’ मालिकेतून मिळणार पालकत्वाचे धडे

पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ही मुलं दबून गेली आहेत. या सगळ्यामुळे नकळत पालक – मुलांमध्ये एक दरी निर्माण झाली आहे.

सोनी मराठी वाहिनीने ‘हम बने तुम बने’च्या एका भागात याच विषयाभोवती मालिकेची कथा गुंफली आहे. जिथे कमी मार्क मिळाले, आता घरी ओरडा पडणार म्हणून रेहा सईच्या रिपोर्ट कार्डवर तिच्या बाबांची खोटी सही करते. ही गोष्ट घरी कळल्यावर तुलिका सईवर ओरडते. हर्षदाचा संताप अनावर होतो तर दुसरीकडे आईसाहेब मुलांवर हात उचलल्यामुळे आपल्या सूनांवर चिडतात.

नात्यांमध्ये वाढलेलं अंतर बने कुटुंबीय कमी करू शकणार का? या सगळ्या प्रश्नांची येत्या ७ फेब्रुवारीला मिळणार. या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रात्री १० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –