‘सुपर ३०’ या चित्रपटाने केली १०० कोटी रुपयांची कमाई

आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला. कोणाताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी आनंद कुमार संघर्ष करत राहिले.

पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असलेल्या या चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन याची मुख्य भूमिका आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करुन या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने एकूण १००.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘सुपर ३०’ने पहिल्या दिवशी ११.८३ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या कमाईच्या आकडेवारीमध्ये कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

You might also like