Hrithik Roshan- हृदयांतर’ मध्ये हृतिक रोशन!

अभिनेता सलमान खान नंतर आता हृतिक रोशन मराठी सिनेमात भूमिका करणार आहे. बॉलिवूडमधील फॅशन डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शित करत असलेल्या पहिल्यावहील्या ‘हृदयांतर’ या मराठी सिनेमात हृतिक रोशन भूमिका साकारणार आहे. हा सिनेमात कौटुंबिक नाते संबंधावर आधारित असून या सिनेमाचे शूटींग सध्या सुरू आहे.
डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाची कथा अत्यंत चांगली आणि आव्हानात्मक असल्याने ती कुणीही नाकारणे शक्यच नव्हते. हृतिकला या चित्रपटाची कथा ऐकवली. त्याने लगेच या सिनेमात काम करण्यास तात्काळ होकार दिला, असंही विक्रम फडणीस यांनी सांगितलं.
हृदयांतर सिनेमाची कथा हृदयस्पर्शी असून या सिनेमा सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात मनिष पॉलदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो मनिष पॉल हीच व्यक्तिरेखा साकारणार आहे.