हृतिक-आलियाचा ‘हा’ फोटो व्हायरल

आलिया भट्ट आणि हृतिक रोशनचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता आणि आलिया भट्ट, आलियाची बहिण शाहीन भट्टदेखील दिसत आहे. स्टार किड्सच्या या फोटोमध्ये हृतिक रोशनही पोज देताना दिसत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक प्रेक्षकांकडून या फोटोला पंसती मिळत आहे. या फोटोमधील हृतिकलाही अनेकांनी पसंती दर्शवली आहे.