श्रिया पिळगांवकरला ‘तेजस्वी चेहरा’ पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार सोहळ्यात सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकर हिला ‘तेजस्वी चेहरा’ या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.

हिंदी-मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली श्रिया पिळगांवकर हिने वयाच्या ५व्या वर्षांपासूनच कॅमेराची भाषा शिकली. लहानपणापासूनच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं पण तिने तिच्या अभिनय कौशल्याने भारतातच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकता मिळवली.अशा सर्वगुण संपन्न अभिनेत्रीला झी युवा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात ‘तेजस्वी चेहरा’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –