‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली कोरोनावर यशस्वी मात

राज्यात मुंबई, ठाणे, पालघर, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात तब्बल 9 हजार 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
‘इश्कबाज’ फेम श्रेणू पारिख हिने करोनावर यशस्वी मात केली आहे. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. पुढील काही दिवस ती घरीच क्वारंटाइनमध्ये राहणार आहे. डिस्चार्ज मिळाल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत श्रेणूने चाहत्यांचे आभार मानले आहेत. याचसोबत श्रेणूच्या तब्येतीची पूर्णपणे काळजी घेणाऱ्या डॉक्टर व नर्सेसचेही तिने आभार मानले.
‘माझ्यावर इतक्या प्रेमाचा व प्रार्थनाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे मी कसे आभार मानू मला समजत नाहीये. देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेने मी बरी होत असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता मी माझ्या घरी संपूर्ण विलगीकरणात राहणार आहे. रुग्णालयातील करोना योद्धांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मी खूप आभारी आहे’, असं तिने लिहिलं.