‘तुझ्या शिवाय एकटी कशी नव्या गोष्टी शिकू…”

आज रक्षाबंधन…भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. अशातच अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आठवण त्याच्या बहिणींना नक्कीच सतावत असणार. चार बहिणींमध्ये सुशांत सर्वात लहान आहे. मितू सिंह सर्वात मोठी बहिण असून त्यानंतर प्रियंका, रानी आणि श्वेतासिंह किर्ती.

भारतात बहुतेक सर्वत्र राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हिंदू, जैन आणि काही शिख धर्मियही हा सण आनंदाने साजरा करतात. मात्र, अश्यातच बॉलिवूड अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’च्या बहिणींवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.

बहीण भावाच्या दिर्घायुष्यसाठी प्रार्थना करते आणि भाऊ आयुष्यभर आपल्या बहिणींला तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. पण सुशांतच्या बहिणींकडे आज तो हात नाही, ज्याला ती राखी बांधू शकेल. रक्षाबंधन निमित्त सुशांतच्या बहिणीने आपल्या लाडक्या भावासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

सुशांतची बहिणी म्हणाली, “गुलशन, मेरा बच्चा आज 35 वर्षांनंतर असा दिवस आपल्या आयुष्यात आला आहे. तुला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट तयार आहे, त्यामध्ये दिवा देखील आहे, पण आरती करण्यासाठी तो चेहरा नाही. मिठाई आहे पण तोंड गोड करण्यासाठी तू नाहीस, कधीही विचार केला नव्हता की आपल्या आयुष्यात असा दिवस येईल. तुझ्याकडून खूप काही शिकली आहे. आता तुझ्या शिवाय एकटी कशी नव्या गोष्टी शिकू… अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सुशांतची मोठी बहिण मीतू सिंह राष्ट्रिय स्तरावरील महिला क्रिकेटर आहे. सुशांतच्या आयुष्यात मितू सिंहला विशेष महत्व होतं. मीतू त्याच्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व होतं. कायपोचे चित्रपटात सुशांतने क्रिकेटरची भूमिका निभावली होती. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मीतूकडून प्रेरणा मिळाली असल्याचं त्यानं सांगितलं होतं.

सुशांतने या जगाचा निरोप घेतला असता तरी, त्याच्या आठवणी कुटुंबासह चाहत्यांना नक्कीच सतावेल आणि त्याच्या असण्याचं महत्वू पटवून देईल. तसेच त्या कठीण समयी आपण त्यासोबतच का नव्हतो, मनात वारंवार येईल….

 

You might also like