हनी सिंगचं ‘मखणा’ गाणं वादात

हनी सिंगचं नवीन गाणं वादात सापडलं आहे. ‘मखणा’ हा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. या गाण्यात हनी सिंगने केलेल्या रॅपवर आक्षेप घेण्यात आला आहे. या रॅपमध्ये महिलांबाबत अशोभनीय व आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

पंजाबच्या महिला आयोगाच्या मनीषा गुलाटी या गाण्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. मनीषा ‘हनी सिंगच्या रॅपमध्ये महिलांविषयी अशोभनीय भाषा वापरली आहे. त्यामुळे हनी सिंग व संबंधित कंपनी अर्थात टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. तसंच या गाण्यावर बंदी घालण्यात यावी,’ अशी मागणी मनीषा यांनी केली आहे.

 

You might also like