हिमांशी खुरानाला करोनाची लागण

पंजाबी कलाकार हिमांशी खुरानाला करोनाची लागण झाली आहे. हिमांशीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. तिच्या संपर्कात आलेल्यांनाही करोना चाचणी करण्याचा सल्ला तिने या पोस्टमध्ये दिला. पंजाबमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिने नुकताच सहभाग घेतला होता.
‘मी तुम्हा सर्वांना हे कळवू इच्छिते की माझा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. योग्य ती काळजी घेऊनही मला करोना झाला. परवा मी आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यावेळी परिसरात थोडीफार लोकांची गर्दीसुद्धा होती.
त्यामुळे मला करोना चाचणी करून घ्यावी असं वाटलं. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. आंदोलन करणाऱ्यांना मी विनंती करते की करोनाचं संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे कृपया स्वत:ची योग्य ती काळजी घ्या’, असं तिने सोशल मीडियावर लिहिलं.