नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडला कोरोनाची लागण

संपूर्ण जगात पसरलेल्या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहली आणि त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण झाली आहे.

हिमांशने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. “नमस्कार, माझा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला करोनाची लक्षणं दिसत होती. सध्या मी १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये आहे. घरातच माझ्यावर उपचार सुरु आहेत. करोनाची लागण तुम्हाला कधीही कुठेही होऊ शकते त्यामुळे स्वच्छता राखा आणि स्वत:ची काळजी घ्या.” अशा आशयाची पोस्ट लिहून त्याने आपल्या चाहत्यांना करोनापासून सावधान केलं आहे.

भारतामध्ये दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

 

You might also like