हेमा मालिनी यांची प्रकृती अस्थिर ? अभिनेत्री इशा देओलने केला खुलासा

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्रात आणखी 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 4360 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला असून 223 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून आता 2,46,600 वर पोहचला आहे. त्यापैकी 99,202 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,36,985 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 10,116 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

अमिताभ बच्चन यांना करोना झाल्यानंतर नीतू कपूर आणि रणवीरला करोना झाल्याची अफवा पसरली होती. तसंच हेमा मालिनी यांचीही तब्येत बिघडल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र या दोन्ही अफवा असल्याचं इशा आणि रिधिमाने स्पष्ट केलं आहे.

हेमा मालिनी यांची प्रकृती अस्थिर असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. यावर अभिनेत्री इशा देओलने खुलासा केला आहे. तिने ट्विट करुन बद्धल माहिती दिली आहे.अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेमा मालिनीदेखील आजारी असल्याची चर्चा होऊ लागली होती. त्यावर इशाने स्पष्टीकरण दिलं आहे.

“माझी आई हेमा मालिनी यांची तब्येत ठीक आहे. ती एकदम फिट आणि व्यवस्थित आहे. ती आजाराची असल्याची अफवा होती. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही दाखविलेल्या प्रेम आणि काळजीसाठी मनापासून धन्यवाद”, असं ट्विट इशाने केलं आहे.

‘या’ कारणामुळे अभिषेकने मानले बीएमसीचे आभार

You might also like