हेमा मालिनी यांनी कोरोनाची लागण ? व्हिडिओ पोस्ट करुन म्हणाल्या…

देशातील करोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्याच्या घडीला करोनामुक्त झालेल्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत तब्बल ५ लाख १५ हजार ३८५ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान बिग बींसोबतच अभिनेत्री हेमा मालिनी यांना देखील करोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र या चर्चांवर स्वत: हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, “मला करोनाची लागण झालेली नाही. भगवान श्री कृष्णाच्या कृपेमुळे मी तंदुरुस्त आहे. माझी काळजी करण्यासाठी धन्यवाद.” त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, काल यावर अभिनेत्री इशा देओलने खुलासा केला आहे. तिने ट्विट करुन बद्धल माहिती दिली आहे.अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेमा मालिनीदेखील आजारी असल्याची चर्चा होऊ लागली होती. त्यावर इशाने स्पष्टीकरण दिलं आहे.

“माझी आई हेमा मालिनी यांची तब्येत ठीक आहे. ती एकदम फिट आणि व्यवस्थित आहे. ती आजाराची असल्याची अफवा होती. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही दाखविलेल्या प्रेम आणि काळजीसाठी मनापासून धन्यवाद”, असं ट्विट इशाने केलं आहे.

 

You might also like