बिग बींसाठी हेमा मालिनी यांनी केली प्रार्थना

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शनिवारी रात्री उशीरा बिग बींनी ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. आता अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील ट्विटद्वारे बिग बींसाठी प्रार्थना केली आहे.

“अमितजी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मी त्यांच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या प्रार्थनांमुळे अमितजी सुखरुप घरी परततील.” अशा आशयाचं ट्विट हेमा मालिनी यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, अमिताभ, अभिषेक यांच्या पाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे. बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

 

 

You might also like