मोठ्या घरातील मुलींसोबत लग्न करून श्रीमंत घरातील जावई बनले ‘हे’ अभिनेता

भारतीय संस्कृतीमध्ये जावयाला खूपच महत्वपूर्ण स्थान मिळाले आहे. जावई घरी आल्यानंतर त्याची चांगली खातिरदारी केली जाते. आणि हा प्रयत्न केला जातो कि जावयाच्या सोईमध्ये कोणतीही कमी पडू नये. बॉलीवूडमध्ये काही असे अभिनेता आहेत जे सर्वात श्रीमंत घरातील जावई आहेत. या सर्व अभिनेत्यांनी आपल्या मर्जीने आपल्या जोडीदाराची निवड केली आहे आणि आज सर्व श्रीमंत घरातील जावई बनले आहेत.

श्रीमंत घरातील जावई बनून त्यांची लाईफ अधिकच आलिशान झाली आहे. चला तर जाणून घेऊया बॉलीवूडच्या त्या अभिनेत्यांबद्दल जे आज एक श्रीमंत घरातील जावई आहेत.

अजय देवगन

अजय देवगनला लोक अॅऊक्शन हिरो म्हणून जास्त ओळखतात. फक्त अॅलक्शनच नाही तर त्याने कॉमेडीमध्ये देखील महारथ मिळवली आहे. अजय देवगनने १९९९ मध्ये काजोलसोबत लग्न केले आणि आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजाचा तो जावई बनला. आज दोघांची जोडी बॉलीवूडमध्ये सुपरहिट आहे.

धनुष

साउथचा सुपरस्टार धनुष साउथचा पहिला सुपरस्टार रजनीकांतचा जावई आहे. धनुषला कोलावरी डी गण्यानंतर जगभरामध्ये प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर रांझना चित्रपटामधून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याने २००४ मध्ये रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले होते.

शर्मन जोशी

शर्मन जोशी आपल्या काळातील प्रसिद्ध विलेन प्रेम चोप्राचा जावई आहे. इडियट्स आणि गोलमालमध्ये काम केल्यानंतर त्याचे नाव सफल अभिनेत्यांमध्ये घेतले जाऊ लागले. २००० मध्ये शर्मन जोशीने प्रेरणा चोप्रासोबत लग्न केले होते.

कुनाल खेमू

कुनाल खेमूने लहानपणी हम हैं राही प्यार के, राजा हिंदुस्तानी, भाई आणि जुड़वा सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला होता. पण मोठे झाल्यानंतर त्याला तितकी सफलता मिळाली नाही. तथापि ढोल, ट्रॅफिक सिग्नल आणि धमाल सारख्या चित्रपटांमधील त्याच्या कामाचे कौतुक केले गेले. कुणाल खेमूने पटौदी घराण्याची मुलगी सोहा अली खानसोबत लग्न केले आहे.

कुणाल कपूर

हे नाव कदाचित धक्कादायक असू शकते. रंग दे बसंती मध्ये आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने कुणालने सर्वांचे मन जिंकले होते. लग्नानंतर कुणाल एक मोठ्या घरातील जावई बनला. त्याने महानायक अमिताभ बच्चनचा छोटा भाऊ अजिताभ बच्चनच्या मुलीसोबत लग्न केले आहे. तो अजिताभ बच्चनचा जावई आहे.

अक्षय कुमार

या लिस्टमध्ये सर्वात पहिला नाव येते ते बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे. राजेश खन्ना हिंदी चित्रपटातील सर्वात पहिले सुपरस्टार मानले जातात आणि अक्षय कुमार त्यांचे जावई आहेत. अक्षय ट्विंकलचे लग्न १७ जानेवारी २००१ मध्ये झाले होते. आज दोघे बॉलीवूडमधील सर्वात आइडियल मानले जातात.

 

सुशांतच्या गर्लफ्रेंडला खून व बलात्काराच्या धमक्या, शेअर केला स्क्रिनशॉट

You might also like