वॉर या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

हृतिक आणि टायगर आता एका चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. वॉर असे त्यांच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाच्या टीझरमध्ये आपल्याला खूप सारी अ‍ॅक्शन आणि थ्रिल अनुभवायला मिळत आहे.

या चित्रपटात वाणी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून या टीझरमध्ये आपल्याला तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. हृतिक आणि टायगरचा वॉर हा चित्रपट हिंदी प्रमाणेच तामीळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.  टायगर आणि वाणीची मुख्य भूमिका असलेला वॉर हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.