अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्ही पाहिलात का?

अजय देवगणचे ‘तानाजी’ आणि ‘टोटल धमाल’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी ‘तानाजी’मधील त्याचा फर्स्ट लूकदेखील प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील फर्स्ट लूकही प्रेक्षकांसमोर आला आहे.

टोटल धमालमधील अजयचा लूक समोर आल्यानंतर त्याने आणि चित्रपट व्यापार विश्लेषण तरण आदर्श यांनी ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. प्रदर्शित झालेल्या या लूकमध्ये अजय रावडी लूकमध्ये दिसत असून त्याच्या खांद्यावर एक माकड बसलं आहे.

अजयने लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. या चित्रपटामध्ये अजयसोबत माधुरी दीक्षित, अनिल कपूर झळकणार आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like