नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित पाहिलात का?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील बायोपिक येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

गेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असं म्हणत अनेकांनी कौतुक केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आले. २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या महिन्यातच ‘पीएम नरेंद्र मोदी’ च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात विवेकसोबतच परेश रावलही मुख्य भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like