इशा-विक्रांतच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ पाहिला का?

‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.या लोकप्रिय मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर लग्नगाठ बांधणार आहेत.येत्या १३ जानेवारीला मालिकेत हा विवाहसोहळा संपन्न होणार असून ११ तारखेला मेहंदी आणि १२ तारखेला साखरपुडा होणार आहे. सध्या या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे. अशातच विक्रांत- इशाच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
विक्रांतने इशासाठी असलेलं त्याचं प्रेम नेहमीच अनोख्या पद्धतीने व्यक्त केलं आहे. या संगीत सोहळ्यातही एका डान्सच्या माध्यमातून विक्रांतने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.
संगीताचा हा क्षण पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल; पण म्हणून लग्नाचा मुहूर्त चुकवून कसं चालेल…!! ????????????
१३ जानेवारी संध्या ७ वा. यायचंय सगळ्यांनी लग्नाला. #TulaPahateRe #LoveBeyondAge #Vikisha #Isha #Vikrant #IshawedsVikrant #GettingMarried @subodhbhave #GrandWeddingOf2019 pic.twitter.com/ei0o8nF6b9— Zee Marathi (@zeemarathi) January 5, 2019
महत्वाच्या बातम्या –