स्वप्नील जोशीचा असा अंदाज तुम्ही कधी पहिला आहे काय ?

स्वप्नील सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे. नुकताच त्याने शेअर केलेला फोटो फॅन्सच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने साडी परिधान केली असून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे.

हा फोटो शेअर करताना किप गेसिंग असं कॅप्शनही त्याने दिले आहे. त्यामुळे हा लूक म्हणजे स्वप्नीलची आगामी भूमिका आहे का असा प्रश्न सुरुवातीला फॅन्सना पडला. सध्या सोशल मीडियावर साडी ट्विटर ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमुळेच स्वप्नीलने हा हटके फोटो शेअर केल्याचं बोललं जात आहे. मात्र या फोटो शेअर करण्यामागचं खरं कारण स्वप्नीलच सांगू शकेल.

You might also like