‘शूटिंगदरम्यान कंगना आत्मविश्वास वाढविण्यासाठी करायची ‘हे’ काम’

शूटिंगसाठी जाता येऊ नये म्हणून मला बळजबरीने ड्रग्स दिलं जायचं, असा खुलासा अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. तिच्या या वक्तव्यावर दिग्दर्शन अनुराग कश्यपने प्रश्न उपस्थित केला. “एखादा व्यक्ती स्वत: पर्याय निवडतो. त्याला कोणीही बळजबरी करू शकत नाही”, असं म्हणत अनुरागने ‘क्वीन’च्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला.
अनुराग म्हणाला, “क्वीन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगना तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शँपेनप्यायची. बळजबरीने काही होऊ शकतं असं मला वाटत नाही कारण मी स्वत: तिला अशा गोष्टी करताना पाहिल्या होत्या. त्यासाठी तिला कोणी बळजबरी केली नव्हती. पडत्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वत:चे पर्याय स्वत: निवडतो.”
गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळतंय. “मी क्षत्रीय आहे. मी शिरच्छेदाला सामोरं जाईन पण कधी माझी मान झुकवणार नाही”, असं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यावर “तू चार-पाच जणांना घेऊन भारत-चीन सीमेवर लढण्यासाठी जा. तुझ्या घरापासून ते जवळच आहे,” असा उपरोधिक टोला अनुरागने लगावला होता.