हार्दिक पंड्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

भारताचा खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
तारक मेहता का उल्टा चश्मा मधून नेहा मेहताची एक्झिट?
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बाबा झाला आहे. त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिच यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. हार्दिक पंड्याने मुलाचा फोटो पोस्ट करुन चाहत्यांना ही बातमी दिली. फोटोमध्ये हार्दिक पंड्याने मुलाचा हात धरला आहे.
लाखो चाहत्यांसह टीम इंडियाच्या खेळाडूंनीही हार्दिक पंड्याचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दोघांचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन केले. त्याचबरोबर केएल राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्टार किड्सला सुद्धा संघर्ष करावा लागतो – श्रुती हसन
हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. “मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत”, अशा भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या.