“मी डॉक्टर कुटुंबातील मुलगा आहे सर माझं हस्ताक्षर पाहून तुम्ही चकित व्हाल”

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रक्रिय चंड सअसतात. यावेळीही बिग बींनी  एक पत्र आपल्या चाहत्यांसाठी लिहिलं होतं. मात्र या पत्रातील बिग बींचं हस्ताक्षर पाहून कार्तिक आर्यनने त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही गंमतीशीर कॉमेंट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“मी डॉक्टर कुटुंबातील मुलगा आहे सर. माझं हस्ताक्षर पाहून तुम्ही चकित व्हाल.” अशा आशयाची कॉमेंट कार्तिकने केली. या कॉमेंटखाली अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बरोबर बोलताय अमितजी तुम्ही. मी अजूनही सर्व काही  पेन आणि कागदावर लिहित आहे.. त्यामुळे मला नवं काहीतरी शिकता येते.”

 

काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?

“कीबोर्ड राइट‍िंगऐवजी हातांनी लिहिणं चांगलं असतं. आपल्याला कायम नवं काही तरी शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. पुन्हा एकदा हातांनी लिहिण्याचा ट्रेंड आणा. हा ट्रेंड आपल्या मेंदूसाठी चांगला आहे.” अशा आशयाचे हस्तलिखित पत्र अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसाठी लिहिले होते.

 

You might also like