Half Girlfriend- ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर रिलीज

दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम, अशी या सिनेमाची टॅगलाईन

मुंबई: अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या सिनेमाचा  ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अर्जुन आणि श्रद्धा ही जोडी पहिल्यांदाच सोबत काम करत आहे .‘हाफ गर्लफ्रेन्ड’ येत्या १९ मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.

या सिनेमाला दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम, अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन मोहित सूरीने केलं.