‘गुंजन सक्‍सेना’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

जान्हवी कपूरचा “गुंजन सक्‍सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित झाला आहे. मात्र, प्रदर्शनाच्या दिवशीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील काही दृष्यांवर भारतीय हवाईदलाने आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात भारतीय हवाईदलाने सेन्सॉर बोर्ड, धर्मा प्रोडक्‍शन कंपनी आणि नेटफ्लिक्‍सला पत्र पाठविले आहे.

या चित्रपटातील काही दृष्ये, संवाद व ट्रेलरमधील काही भाग भारतीय हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा तयार करत असल्याचे निदर्शनास आले.

चित्रटातील मुख्य पात्राचे म्हणजेच फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्‍सेना यांचे महत्त्व वाढवून दाखवण्यासाठी धर्मा प्रोडक्‍शनने काही घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत. भारतीय हवाई दलामध्ये महिलांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल चुकीचा संदेश या मध्यमातून दिला जात आहे, असे या पत्रामध्ये नमूद केले आहे.

You might also like