‘गली बॉय’ चित्रपटाचे ‘मेरे गली में’ गाणे प्रदर्शित

रणवीर- आलियाचा ‘गली बॉय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा ‘गली बॉय’मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील ‘अपना टाईम आयेगा’ हे पहिलं गाण प्रदर्शित झालं होतं. हे गाणं खुद्द रणवीरने गायलं असून ते रॅप साँग होतं. त्यातच या चित्रपटातील ‘मेरे गली में’ हे गाणंही प्रदर्शित झालं आहे.

हे गाणं सुद्धा रणवीर सिंगने गायलं असून डब शर्मा आणि डिव्हाइन यांनी कंपोज केलं आहे.मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like