नातवाला मिळाले आजोबा जितेंद्र यांचे नाव

एकता कपूर सरोगसीद्वारे आई झाली असून २७ जानेवारीला तिला एक मुलगा झाला. तिचा मुलगा एकदम स्वस्थ असून लवकरच तो एकताच्या घरी येईल, असे कळतेय. आता एकता मुलाच्या नावासंबंधीत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एकताने सांगितले ती मुलाचे नाव रवि ठेवतेय. एकता आणि तुषार कपूरचे वडील जितेंद्र यांचे नावदेखील रवि होते त्यानंतर त्यांनी ते बदलून जितेंद्र केले.

जितेंद्र यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, याआधी मी दादा झालो होता आणि नानासुद्धा झालो. रविच्या जन्माने आमचे कुटुंब पूर्ण झाले. पुढे ते म्हणाले, की आम्ही पत्रिकेनुसार नाव ठेवले आहे. त्याच्या नावाचे पहिले अक्षर ‘र’ आले होते मग एकताने विचार केला बाबांचे नाव का ठेवू नये?,  मी आणि शोभा खूप आनंदी आहोत आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, आता आम्ही त्याच्या घरी यायची वाट पाहत आहोत.”

 

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like