‘बागी ३’च्या शूटिंगला सुरुवात; फोटो व्हायरल

‘बागी २’ चित्रपटात टायगर श्रॉफसह दिशा पटानीने भूमिका साकारली होती. तर ‘बागी’मध्ये टायगर आणि श्रद्धा कपूरची जोडी एकत्र झळकली होती. आता या सुपरहिट सीरीजमधील ‘बागी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बागी ३’चं शूटिंग सुरु करण्यात आलं आहे. पण ‘बागी ३’मध्ये दिशा पटानी नसून पुन्हा एकदा श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दिग्दर्शक अहमद खान, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि निर्माता साजिद नाडियावाला दिसत आहेत. सध्या श्रद्दा कपूरच्या ‘साहो’ आणि ‘छिछोरे’ या दोन चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तर टायगर श्रॉफ त्याच्या आगामी ‘वॉर’ चित्रपटातून हृतिक रोशनसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.