चुकीच्या वेळी लग्न करणे ह्या बॉलीवुड अभिनेत्रींना पडले महाग

अभिनेत्रींचे करियर आणि त्यांच्या लग्नाचा एकमेकांशी काही सं-बंध नाही, परंतु या अभिनेत्रींच्या कारकीर्दीवर त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. ‘लग्नानंतर करिअर खराब होतं.’ ही गोष्ट स्त्रियांनी बर्‍याच वेळा ऐकली असेल.खासकरून जेव्हा आपल्याला लग्नानंतर कुटुंबाचा पाठिंबा नसतो. तीच गोष्ट बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनाही लागू झाली आहे.

चला तर मग याची काही उदाहरणे पाहूया….

सोनाली बेंद्रे 

सोनालीचे बॉलिवूडमध्ये “मेजर साब” आणि “हम साथ साथ हैं” या सारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. जेव्हा तिने गोल्डी बहलशी लग्न केले तेव्हा ती तिच्या कारकीर्दीच्या पहिल्या नंबरच्या स्थानी होती. मात्र लग्नाच्या बाबतीत तिला आपल्या फिल्मी करिअरशी तडजोड करावी लागली. काही महिन्यांपूर्वी तिला कर्क रोग देखील झाला होता.

माधुरी दीक्षित 

माधुरीचे आधी संजय दत्तबरोबर प्रेम प्रकरण होते. पण संजय दत्तला बेकायदेशीरपणे हत्यारे ठेवल्यामुळे तुरुंगात जावे लागले. अशा परिस्थितीत माधुरीने डॉ नेनेशी अरेंज-मॅरेज  केले. माधुरीचे लग्न झाले तेव्हा तिच फिल्मी करिअर खूप उंचावर होत. डॉ. नेने यांना माधुरीच्या स्टारडमबद्दल माहिती नव्हते. या लग्नामुळे माधुरी बॉलिवूडपासून दूर गेली. नंतर, बरीच विश्रांती घेतल्यानंतर माधुरीने चित्रपटात परतण्याचा प्रयत्न केला पण तिला काही खास यश आले नाही.

भाग्यश्री 

भाग्यश्रीचा बॉलिवूड डेब्यू ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र, या चित्रपटाच्या नंतरच तिने १९ व्या वर्षी हिमालय दासानीशी लग्न केले. लग्नांनंतर भाग्यश्रीच्या सासरच्यांनी तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली नाही आणि तिचे करियर संपले.

ट्विंकल खन्ना

ट्विंकलने बॉलिवूडचा अक्षय कुमारशी लग्न केले तेव्हा तिचे करियर खूप उंचावर होते.पण, लग्नांनंतर लग्नाचा तिच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आणि ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली. परंतु सध्या ती अभिनेत्री म्हणून सक्रिय नसलीतरी ती चित्रपट निर्माता म्हणून बर्‍यापैकी यशस्वी आहे.

ऐश्वर्या राय

मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळवलेल्या ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केले तेव्हा ती कारकीर्दीच्या शिखरावर होती. लग्नानंतर ऐश्वर्याने बॉलीवूड मध्ये परतण्याचा प्रयत्न केला पण तिला काही खास यश आले नाही.

काजोल 

१९९० च्या दशकात काजोल टॉप अभिनेत्री होती. मात्र, अजय देवगणशी लग्न केल्यानंतर तिची फिल्मी कारकीर्द बुडत गेली. नंतर काजोलने बर्‍याच वेळा बॉलीवूडमध्ये परतण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी अभिनेत्री होऊ शकली नाही. पण तिचा आताचा चित्रपट ‘तान्हाजी – द अनसंग व्हॅरियर’ मध्ये तिचा अभिनय दमदार आहे.

अक्षय कुमारच्या घरात येणाऱ्या दुधाची किंमत ऐकून बसेल शॉक

You might also like