निसर्गाच्या सानिध्यात जेनिलिया घेतीये मुलांचा अभ्यास

सध्या लॉकडाऊन मुळे अनेक जण गावाला अडकले आहेत. अशीच काहीसे जेनेलिया देशमुख हिच्या बाबतीत घडले आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या मुलांसह रितेश देशमुख यांच्या गावी अडकली आहे. मात्र तिने या लॉकडाऊनची झळ आपल्या मुलांना न देता गावात छान निसर्गाच्या सान्निध्यात आनंद कसा घ्यायचा याचे धडे देत आहेत. यासाठी तिने आपल्या शेतात जाऊन आपल्या मुलांना एका छान झाडाखाली बसवून त्यांच्या अभ्यास घेतानाच सुंदर व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
जेनिलिया मुलांच्या जन्मानंतर घरामध्ये रमली आहे. अनेकदा ती मुलांसोबतचे फोटो, व्हिडियो शेअर करत असते. आताही तिने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती रिहान आणि राहिलचा अभ्यास घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे तिघेही शेतातील मोठ्या झाडाखाली बसले आहेत