गश्मिर महाजनीने आशाढीनिमित्त पोस्ट केला एक खास फोटो

आषाढी एकादशीनिमित्त आज सगळीकडे भक्तीमय माहोल आहे. सोशल मिडियावर देखील एकादशीनिमित्त उत्साह पाहायला मिळतोय. अनेक कलाकार आषाढीनिमित्त शुभेच्छा देत आहेत. पण अभिनेता गश्मिर महाजनीने आशाढीनिमित्त एक खास फोटो पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
विठु माऊलींच्या वारीत सहभागी झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा फोटो आजच्या शुभ दिनी, प्रथमच तुमच्या सोबत शेअर करत आहे. जय जय राम कृष्ण हरी..,असं म्हणत तमाम वारकरी बंधूंना, विठ्ठल भक्तांना गश्मिरने आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.