‘गली बॉय’चे ‘अपना टाइम आएगा’ गाणं प्रदर्शित

रणवीर सिंह आणि आलिया भट्टचं आगामी सिनेमा ‘गली बॉय’चं गाणं रिलीज झालं आहे. ‘अपना टाइम आएगा’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला रणवीरनेच गायलं असून हे गाणं डब शर्मा अॅण्ड डिवाइनने कंपोज केलं आहे .या सिनेमाकरता रणवीर सिंहने रॅपर्सकडून रॅपचं ट्रेनिंग देखील घेतलं आहे.

या सिनेमात रणवीर सिंहच्या डोक्यात रॅपर होण्याचं खुळ दिसत आहे. अनेक प्रसंगांना तोंड देत तो या ध्येयापर्यंत पोहचू इच्छितो. त्याचा हा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. गली बॉय’ हा सिनेमा स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिस आणि नावेद शेख यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमा दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे. या सिनेमात रणवीर अतिशय गरिब कुटुंबातील आहे. तर आलिया भट्ट मुस्लिम कुटुंबातील दाखवली आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like