टिकटॉक स्टार फैझल शेखसह चार जणांवर गुन्हा दाखल

झारखंडमधील मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तबरेज अन्सारीसंबंधी व्हिडिओ टिकटॉकवर बनवल्याप्रकरणी मुंबईतील पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओत तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख असून जर त्याच्या (तबरेजच्या) मुलाने उद्या खुनाचा बदला घेतला तर त्याला दहशतवादी म्हणू नका, असे म्हणत हा व्हिडिओ बनवून अपलोड करण्यात आला आहे. टिकटॉकवर आल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला.

भारतीय विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख रमेश सोळंकी यांनी लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या 5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैझल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच आणि एस. फारुकी अशी या तरुणांची नावे आहेत. हे सर्व टिकटॉक स्टार असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटींच्या घरात आहे.