…..म्हणून बंद झाल्यात बॉलिवूडच्या अनेक होळी पार्ट्या

बॉलिवूडची होळी सेलिब्रेशन नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर या स्टारच्या होळी पार्टीची नेहमी चर्चा असते. अनेक कलाकार आपल्या घरी होळीनिमित्त पार्टीचं आयोजन करत होते. पण हळूहळू हे बंद झालं.
सुभाष घई
सुभाष घई यांच्या मड आयलँड येथील बंगल्यावर होळीचं सेलिब्रेशन होत असत. पण आता ही पार्टी बंद झाली आहे. यामध्ये टेक्निशियन्स आणि डिझायनर देखील सहभागी होत होते.
यश चोपडा
यश चोपडा यांच्या यशराज स्टूडिओमध्ये देखील होळी पार्टीचं आयोजन होत होतं. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार या पार्टीला हजेरी लावत असत. पण त्यांच्या निधनानंतर ही होळी पार्टी बंद झाली.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यावर ग्रँड होळी पार्टी होत होती. पण २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर ही पार्टी बंद झाली.
राज कपूर
आरके स्टूडिओमध्ये होणारी होळी नेहमीच चर्चेचा विषय असायची. या पार्टीला अनेक कलाकार उपस्थित राहत होते. सकाळीपासून सुरु होणारी ही पार्टी संध्याकाळीपर्यंत सुरु असायची. राज कपूर हे पार्टी होस्ट करत होते. पण १९८८ मध्ये राज कपूर यांच्या निधनानंतर ही पार्टी बंद झाली होती.
महत्वाच्या बातम्या –