Photos : ‘या’ कामासाठी पहिल्यांदाच एकत्र आले सई, तेजस्विनी, सिद्धार्थ आणि उमेश

लकी चित्रपटाचे  टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. अभय महाजन-दिप्ती सती ह्या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव ह्यावेळी उपस्थित होते.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “ह्या गाण्याच्या लाँचला खूप भारी प्रतिसाद मिळाला. टाळ्या,शिट्या आणि जल्लोषाने खच्चून भरलेल्या मॉलमध्ये गाण्याचे लाँच करण्याचा अनुभव अद्भूत होता. प्रेक्षकांनी माझ्यावर आत्तापर्यंत जे प्रेम केले आहे, त्याचा मी ऋणी आहे. आणि मला विश्वास आहे, लकी सिनेमाला ते असाच भरभरून प्रतिसाद देतील.”

सचिन पाठकने लिहीलेल्या ह्या गाण्याला अमितराज ह्यांनी संगीतबध्द केलंय आणि गायलंय. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत ह्यांच्यावर गाणे चित्रीत झाले आहे. मराठी सिनेसृष्टीतले हे चार सुपरस्टार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like