सनी लियोनीने दिल्या फिटनेसच्या खास टीप्स

बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. लॉकडाउनमुळे सध्या ती अमेरिकेत आपल्या कुटुंबीयांसह टाइम स्पेंड करत आहे. सनी आपल्या फिटनेसबाबत खूपच जागृत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना फिटनेसच्या खास टीप्स दिल्या आहेत.

सनी लियोनीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती एक्‍सरसाइज करताना दिसते. यात ती लॅग्स आणि ब्यूटी एक्‍सरसाइज करताना दिसते, ज्यामुळे तिला स्लिम राहण्यास मदत मिळते. सनी लियोनीचे हे वर्कआउट लोकांना खूपच आवडले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, लॅग आणि ब्यूटी वर्कआउट हे सोपे नाही. दरम्यान, यापूर्वीही तिने घरात सायकलिंग मशिनवरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा ती म्हणाली की, सध्या जिम बंद आहेत. अशा परिस्थितीत बाहेर जाण्यापेक्षा घरात एक्‍सरसाइज करणे चांगले आहे.

दरम्यान, करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सनी लियोनी भारतातून आपल्या कुटुंबीयांसह अमेरिकाला गेली आहे. तेव्हापासून ती अद्यापही तिथेच आहे. आता लॉकडाऊन शिथिल होत असल्याने ती लवकरच भारतात येणार असल्याचे समजते.

View this post on Instagram

Leg and booty workouts are never easy!! Blah

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

You might also like