जोया अख्‍तरच्‍या नव्‍या वेब सीरीजचा फर्स्ट लुक प्रदर्शित

जोया अख्तर आणि रीमा कागती यांची नव्‍या वेब सीरीजचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरीजचे नाव  ‘मेड इन हेवन’आहे. वेब सीरीजच्‍या ‘मेड इन हेवन’चा फर्स्ट लुक पोस्टर व्‍हायरल झाला आहे. या पोस्टरमध्‍ये जिम सरभ, कल्कि कोचलिनसह अनेक कलाकार दिसत आहेत. ‘मेड इन हेवन’ ८ मार्चला रिलीज होणार आहे. 

रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि नित्या मेहरा वेब सीरीजचे एक्‍झिक्युटिव्‍ह प्रोड्यूसर्स आहेत. जोया अख्तर, रीमा कागतीसोबत प्रशांत नायर आणि अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्‍दर्शन केले आहे. जिम सरभ, कल्कि कोचलिन, शशांक अरोरा, अर्जुन माथुर, शिवानी रघुवंशी आणि सोभिता धूलीपाला या वेब सीरीजमध्‍ये मुख्य भूमिकेत आहेत.

या वेब सीरिजची कहाणी एका शानदार लग्‍नापासून सुरू होते. पुढे या लग्‍नाचे अनेक खोट्‍या गोष्‍टी आणि रहस्य उघडकीस येतात.

महत्वाच्या बातम्या –