संजय जाधवच्या ‘लकी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर  सोशल मीडियावरून रिलीज झाले. पोस्टरमध्ये सिनेमातला  अभिनेता अभय महाजन निव्रस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतोय.

बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ चित्रपटाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. ह्या पोस्टरबद्दल बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी चित्रपटाचे निर्माते सुरज सिंग म्हणाले, “मराठी तरूण आणि मराठी चित्रपट कात टाकतोय. आजच्या तरूणांवरचा चित्र चित्रपट असल्याने तुम्हाला असे अनेक सुखद आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. संजयदादा निखळ मनोरंजनासाठी लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या धाटणीची मनोरंजक फिल्म आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय.”

संजय जाधव म्हणाला, “लकी ही आजच्या तरूणाईची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंद आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामूळे लकीमध्येही तुम्हाला अशी अपारंपारिक सरप्राइजेस मिळतील.”

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like