भाऊ कदमवर गुन्हा दाखल करा….

भाऊ कदमच्या नशीबवान या चित्रपटावर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार संघटनेने आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर चित्रपटाशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.या चित्रपटात सफाई कामगारांबाबत अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेने केला आहे.

त्यामुळे कामगारांची प्रतिमा मलिन होत असून, या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं अशी मागणी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर पोलिसांचीही प्रतिमा मलिन केल्याचा दावा सफाई कामगार संघटनेने केला आहे.

भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेला ‘नशीबवान’ हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात भाऊ कदम यांच्यासोबत, अभिनेत्री मिताली जगताप-व्हराडकर, नेहा जोशी, अभिनेते जयवंत वाडकर इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनील वसंत गोळे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like