जाणून घ्या….लग्नाच्या लिफाफ्यामध्ये किती रुपये ठेवतात बॉलीवूड स्टार्स

भारतीय लग्नामध्ये खूप धूमधाम असते. लग्नाच्या गार्डनपासून स्वादिष्ट भोजन, लाईटिंग, बँड बाजा वरात आणि डिझायनर कपडे घातलेले वर आणि वधू हे सर्व लग्नाची रोनक आणखीन वाढवतात. .जेव्हा आपण लग्नामध्ये जातो तेव्हा सोबत कोणतेना कोणते गिफ्ट घेऊन जातो. लग्नाच्या या लिफाफ्यामध्ये लोक किती रुपये ठेवतात हे अनेक गोष्टीवर अवलंबून असते.

तुम्हाला माहित आहे काय फिल्मी कलाकार जेव्हा एखाद्याच्या लग्नामध्ये जातात तेव्हा ते लिफाफ्यामध्ये किती रक्कम ठेवत असतील. जेव्हा कोणी मोठा कलाकार लग्नामध्ये हजेरी लावतो तेव्हा त्याच्यामागे अनेक लोक फोटो घेण्यासाठी लागतात. यामध्ये काही शंका नाही कि फिल्मी कलाकार खूप पैसा कमावतात.

लोकांच्या मनामध्ये जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढते कि बॉलीवूडचे कलाकार लग्नामध्ये देण्यासाठी लिफाफ्यामध्ये किती रुपये ठेवतात. तसे तर रक्कम जाणून तुम्ही थक्क नक्की होणार. बॉलीवूडच्या लग्नामध्ये सेलिब्रिटी लिफाफ्यामध्ये १०१ रुपये ठेवतात. हि गोष्ट खरी आहे आणि याचा खुलासा स्वतः अमिताभ बच्चन यांनी एका शो मध्ये केला होता.

या शोमध्ये त्यांच्या सोबत कॉमेडियन कपिल शर्मासुद्धा होता. त्याने असेच मजेमध्ये विचारले होते कि हे फिल्मी कलाकार जेव्हा लग्नामध्ये जातात तेव्हा लिफाफ्यामध्ये किती रक्कम ठेवतात. यावर बॉलीवूडचे महानायक अमिताभजीने सांगितले होते कि फिल्म इंडस्ट्रीमध्ये गिफ्टच्या स्वरुपात लिफाफ्यामध्ये शकून म्हणून १०१ रुपये दिले जातात.

वास्तविक यामागे एक खास कारण आहे.गिफ्ट म्हणून एखाद्याला किती रक्कम दिली जावी याबद्दल नेहमीच दुविधा असते. खासकरून जूनियर आर्टिस्ट आणि कॅमेरामनसारखे लोक आपल्यापेक्षा मोठ्या कलाकार किंवा निर्माता, डायरेक्टर इत्यादीच्या पार्टीमध्ये जाण्यास संकोच करत होते.अशामध्ये फिल्म इंडस्ट्रीने एक कॉमन रक्कम शकून म्हणून १०१ रुपये निश्चित केली.

10 पुरुषांशी प्रेमसंबंध होते, लग्न न करता 2 मुलांची आई बनली ‘हि’ अभिनेत्री