दोन दिवसांत ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने कमावले इतके कोटी…!

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ ३ कोटी ३० लाख रूपयांची कमाई केली. तर दुस-या दिवशी कमाईचा आकडा वाढत ४.६५ कोटींवर पोहोचला. आज रविवारी या कमाईत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

या चित्रपटात सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत. सुमारे १५०० स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली आहे.  एका नवीन आणि तितकाच बोल्ड विषय मांडणा-या या चित्रपटाकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या. पण पहिल्या दिवशीची कमाई बघता, या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित आहे. अनिल कपूर व सोनम कपूर या रिअल बाप-लेकीच्या जोडीने या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like