‘सायकल चालविताना 12 वर्षांची वाटते’

बॉलीवूड जगतात आपल्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री दिया मिर्झा सांगते की, ती सायकल चालवताना 12 वर्षांची दिसते. दियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रेड पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाच्या सोल्डर टॉपवर सायकल चालविताना दिसत आहे. तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी सायकल चालविताना 12 वर्षांची वाटते.

दियाने 2001 मध्ये “रहेना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती “दम’, “दीवानापन’, “तुमको न भूल पाएंगे’ आणि “परिणिता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. यापूर्वी ती “थप्पड’ चित्रपटात झळकली होती.

दरम्यान, दिया मिर्झाने चित्रपटांमधून ब्रेक घेतल्यानंतर चित्रपट निर्मितीत आपले नशीब आजमावले आहे, पण इथेसुद्धा तिला काही विशेष यश हाती आले नाही. तिने आतापर्यंत “लव ब्रेक जिंदगी’ आणि “बॉबी जासूस’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली असून दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत.

 

You might also like