फरहान-शिबानीने गपचूप केला साखरपुडा, मार्च-एप्रिलमध्ये करणार लग्न?

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरयांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे.  आता यांचा गुपचूप साखरपुडा पार पडल्याचं कळतंय.सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार ही जोडी येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र अद्याप या गोष्टीला त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही.

२०१७ साली फरहानने आपल्या पहिल्या पत्नीशि अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं देखील आहे. फरहानच्या मुलांनीही हे नाते मनापासून स्वीकारले आहे. शिबानी नुकतीच फरहानची मुलं आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसली. ‘फरहान आणि शिबानी या नात्याबद्दल खूपच गंभीर आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like