सोनू सूदच्या ‘या’ चित्रपटासाठी चाहते उत्सुक

या चित्रपटात सोनू सूद आहे म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने ज्याप्रकारे लोकांची मदत केली, स्थलांतरीत मजुरांसाठी जीवाचे रान केले, ते पाहून लोक सोनू सूदच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. सोनूची रिअल हिरोची प्रतीमा तयार झाली आहे.
पद्मावतला करणी सेनेने केलेला विरोध प्रेक्षक अद्याप विसरलेले नसतील. अनेक महिने आंदोलन, निदर्शने, कोर्ट कचेऱ्या झाल्यानंतर नाव “पद्मावती’चे “पद्मावत’ असे बदलून तो सिनेमा रिलीज् झाला होता. आता अक्षय कुमार अणि मानुषी छिल्लरच्या “पृथ्वीराज’लाही करणी सेनेने विरोध करायला सुरुवात केली आहे.
“पृथ्वीराज’ची संपूर्ण स्क्रीप्ट करणी सेनेने वाचायला मागितली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर ‘पृथ्वीराज चौहान’मधील सोनूच्या भूमिकेची आत्तापासूनच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय. दरम्यान मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार हे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे.