मला तुझ्याशी लग्न करण्याची परवानगी दे….असे म्हणणाऱ्या चाहतीला आर. माधवनने दिले उत्तर

आर. माधवन. तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आर माधवन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे नेहमीच पाहायला मिळते. तो सोशल मीडियाच्या माध्यामातून सतत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतो. नुकताच एका यूजरने आर. माधवनला लग्नाची मागणी घालती आहे. त्यावर त्याने  भन्नाट उत्तर देत त्या यूजरला प्रश्न विचारला आहे.

‘हाय आर. माधवन, मी तुझे जुने गाणे पुन्हा पाहत होते. कृपया मला तुझ्याशी लग्न करण्याची परवानगी दे’ असे एका यूजरने ट्विट करत म्हटले आहे. हे ट्विट त्या यूजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. आर. माधवन गाण्यामध्ये अनोख्या स्टाइलमध्ये नाचताना दिसत आहे.

त्या यूजरने शेअर केलेला व्हिडीओ पाहून आर. माधवनने देखील उत्तर दिले आहे. त्याने ‘तुला तामिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात वाईट डान्सरशी लग्न करायचे आहे का?’ असा प्रश्न त्या यूजरला विचारला आहे.

‘नाला दमयंथी’ हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आर. माधवनने ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका तामिळ कूकची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मीती कमल हासन यांनी केली आहे.

‘या’ अभनेत्रीला २० दिवस होऊन गेले तरी येतीय सुशांतची आठवण

You might also like