हॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

अभिनेता जॉन सेक्सन यांचं निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. त्यांची पत्नी ग्लोरिआ मार्शल यांनी जॉनच्या निधनाची बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून ते निमोनियामुळे त्रस्त होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं.

जॉन सेक्सन यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. जॉन सेक्सन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता होते. ते एक उत्तम मार्शल आर्टिस्ट होते. त्यामुळे प्रामुख्याने त्यांना अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जायचे. १९५४ साली त्यांनी ‘इट्स हॅपन टू यू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

त्यानंतर ‘अ स्टार ईन बॉर्न’, ‘रनिंग वाईल्ड’, ‘धिस हॅप्पी फिलिंग’, ‘द बिग फिशरमॅन’ यांसारख्या काही रोमँटिंक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. परंतु त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘एन्टर द ड्रायगन’ या चित्रपटानं. या चित्रपटात त्यांनी चक्क सुपरस्टार फायटर ब्रूस लीसोबत फाईट केली होती. त्यांनतर ‘क्विन ऑफ ब्लड’, ‘इव्हिल आय’, ‘ब्लॅक ख्रिसमस’ या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. जॉन सेक्सन यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

You might also like