…..तर मुलांचा असा अभ्यास घेतात भाऊ कदम, पाहा हा भन्नाट व्हिडीओ

महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके विनोदवीर भाऊ कदम यांच्या धम्माल विनोदांचे सर्वचजण चाहते आहोत.मात्र, भाऊ कदम आपल्या घरी कसे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचा अभ्यास ते कसे घेतात हे तुम्हालासुध्दा जाणून घ्यायची उत्सुकता नक्कीच असेल तर हे जाणून घेण्यासाठी स्वतः भाऊ कदम यांनी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओ मध्ये भाऊ कदम मुलांचा अभ्यास घ्यायला बसले असल्याचे दिसून येत आहे. आणि त्यांनी त्यांच्या मुलींना स्पेलिंग विचारुन भांडावून सोडलं…पण ऐकतील ती मुलं कसली… त्यांनीच भाऊंना एक स्पेलिंग विचारुन सळो कि पळो करुन टाकलं….मग भाऊंनी घाबरुन मुलांना आईला हे सांगू नका अशी  ताकीद दिली.

भाऊ कदम आणि त्यांच्या मुलांचा हा भन्नाट अभ्यासाचा व्हिडीओ पाहून तुमचीही हसून हसून पुरेवाट लागेल. दरम्यान, ३ महिन्याच्या लॉकडाउन नंतर पुन्हा शूटिंगला सुरवात झाली आहे. नुकतेच ‘चला हवा येऊ द्या’ शोचं शुटिंग सुरु झालं आहे.ह कलाकारांची संपूर्ण टीम पुन्हा एकदा हसवण्यास सज्ज झाली आहे. सेटवर सगळी काळजी घेऊनच शुटिंगला सुरुवात केली आहे.

You might also like