आता ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिकेचा बंगला केला सील

राज्यातील कोरोनाचा कहर हा काही कमी होत नसल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. २ दिवसांपूर्वी बॉलिवूड चे शेहनशाह मानल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांचे सर्व बंगले सील करण्यात आले होते. तर ज्येष्ठ अभिनेत्या रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षकाला कोरोना झाल्यामुळे पालिकेने त्यांचा देखील बंगला सील केला होता.

आता बातमी आहे की बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगला पालिकेने सील केला आहे.बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगला रेखाच्या बंगल्याच्या शेजारीच आहे. दोन्ही बंगले जवळजवळ असल्याने महापालिकेने दक्षतेसाठी कारवाई केली आहे. अद्याप झोया अख्तर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली नाही.रेखाच्या अगोदर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी स्टाफला कोरोना असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यानंतर कलाकारांनादेखील क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

अलीकडेच स्वत: आमीर खानने आपल्या कर्मचार्यांना कोरोना असल्याचे सांगितले होते. अमीर खान याने याबद्दल खुलासा केला होता कि, “माझे कुटुंब, घरामधील बाकीचे कर्मचारी आणि माझीही कोरोनाची चाचणी घेण्यात आली, जी नकारात्मक झाली आहे. परंतु आम्ही अजूनही खबरदारी घेत आहोत. मला आणि माझ्या कुटुंबीयांकडून बीएमसीचे आभार, ज्याने आम्हाला मदत केली आणि आम्हाला मार्ग दाखविला. सर्व सुरक्षित रहा,” असे आवाहन देखील त्याने केले होते.

तर, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने ‘पीटीआय’शी बोलताना दिली. तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

 

You might also like