प्रसिद्ध ऍक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचे निधन

अजय देवगण याच्या वडिलांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. हिंदी कलाविश्वात साहसी दृश्यांच्या आखणीसाठी आणि विविध थरारक दृश्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, ‘स्टंटमॅन’ म्हणून वेगळी ओळख असणाऱ्या वीरु देवगण यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. ज्यामुळे त्यांना सांताक्रुझ येथे एका रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं.