पहाटे शपथविधी होवू शकतो, मग अनधिकृत बांधकाम तोडले यात गैर काय?

कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती जास्त वाटते, अशी वक्तव्य केल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवून पहाटे फडणवीसांचा शपथविधी होवू शकतो, रात्रीच्या अंधारात झाडे कापली जाऊ शकतात, पंतप्रधान फक्त तीन तास झोपून भारत सरकारचे २६ सार्वजनिक सरकारी उपक्रम विकू शकतात, तर मग मुंबई महानगरपालिकेने अगोदर नोटीस देवून, कंगणाचे अनधिकृत बांधकाम तोडले तर, त्यात गैर काय? असे मत पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी व्यक्त केले असून त्यांनी कंगना राणावत व भाजपवर टीका केली आहे.
कंगना राणावत ही अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस व मुंबईचा अपमान करत आहे. तसेच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे तिच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन पारनेर तालुका शिवसेनेच्यावतीने तहसिलदारांना देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:-