मुंबईत नसतानाही ‘या’ अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल

 एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरण विरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेत्री रेणुका शहाणे, अभिनेता अर्शद वारसी यांच्या सोबत आता अजून एका अभिनेत्रीने ट्विट करत आपल्याला आलेल्या बिलाबद्दल आश्यर्य व्यक्त केलं आहे.

आता पूजा बेदी देखील वाढीव वीज बिलामुळे वैतागली आहे. गेल्या महिन्यात वीज बिल कमी आल्यामुळे तिने आनंद व्यक्त केला होता. मात्र यावेळी वीज कंपनीने तिला अधिक बिल पाठवून तिच्या आनंदावर विरजण पाडलं आहे. अभिनेत्री पूजा बेदी हिने ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘“मी उगाचच आनंद व्यक्त केला होता. या महिन्यात माझं विजेचं बील आठ हजारांवरुन थेट ३२२५० रुपयांवर पोहोचलं आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये नसताना मला इतकं बिल आलं आहे. हे कल्पनेच्या पलिकडलं आहे". आता हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

 

You might also like